2 नोव्हेंबर रोजी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे गुरुवारी आदरांजली सभा

    66
    Advertisements

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.1नोव्हेंबर):-ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. विद्रोही साहित्यविश्व, चित्रपटसृष्टी, नाटक या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. युगप्रवर्तक बसवण्णा यांच्या जीवन-तत्वज्ञानावर त्यांनी दीर्घ लेखनही केले. न पेटलेले दिवे, ग्रामीण महाराष्ट्र, भारताची शोधयात्रा, तिच्या नवऱ्याचं वैकुंठगमन, सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम आदी महत्वाचे ग्रंथ त्यांच्या नावे आहेत.

    आपल्यातील एक संवेदनशील माणूस, साहित्यिक, मार्गदर्शक हरपला आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती प्रकाशन, सम्यक प्रतिष्ठान, संवाद प्रकाशन आणि समविचारी पक्ष, संघटना, व्यक्ती व संस्था यांच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील मान्यवरांनी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.