मराठा आरक्षणासाठी कुकूडवाड येथील मुस्लिम बांधवाचा पाठिंबा

    119
    Advertisements

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.1नोव्हेंबर):-मराठा आरक्षण प्रश्नी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्षयोद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून सकल मराठा समाज कुकुडवाड यांच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास मुस्लिम जमात कुकुडवाड यांनी आपली उपस्थिती दर्शवत पाठींबा दिला.

    यावेळी सकल मुस्लिम जमात कुकुडवाड यांच्यावतीने छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार व शेला अर्पण करून उपोषणास प्रारंभ केला. मोठा भाऊ मराठा आपल्या रास्त मागणीसाठी उपोषणास बसला असताना लहान भाऊ म्हणून मुस्लिम समाजही या लढाईत खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे यावेळी मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आले. तसेच शासनाने आता वेळकाढूपणा न करता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची एकमुखी मागणी केली.

    यावेळी उपोषणस्थळी सकल मराठा समाज कुकुडवाड सह सकल मराठा समाज मानेवाडी देखील लक्षणीय संख्येने उपस्थित होता. यावेळी मानेवाडी मराठा समाजाकडून शासनास जाग यावी म्हणून भजन सादर केले