श्री अनिलजी अग्रवाल अमरावती मंडल व मातृभूमीच्या यशाचे मानकरी – प्रा.अरुण बुंदेले

    121
    Advertisements

    ?” कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे मा.श्री अनिलजी अग्रवाल यांचा सत्कार “

    ✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    अमरावती(दि.4नोव्हेंबर):-जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष , दैनिक अमरावती मंडळ आणि दैनिक मातृभूमीचे प्रबंध संपादक माननीय श्री अनिलभाऊ अग्रवाल यांचा दि.3 नोव्हेंबर 2023 ला त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या भव्यसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

    याप्रसंगी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी संपादक मा.श्री अनिलभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला. आणि माननीय श्री अनिलजी अग्रवाल यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील स्वरचित “मा.श्री अनिलजी अग्रवाल ” ही अभंगरचना गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि ” मा.श्री अनिलजी अग्रवाल यांचे सहा दशकापासून संध्या दैनिक अमरावती मंडळ सतत यशस्वीपणे सुरू असून सांध्य दैनिक अमरावती मंडळ आणि दैनिक मातृभूमीच्या आजच्या यशाचे मानकरी आहेत. ही यशोगाथा सतत वृद्धिंगत होत आहे.त्याचे श्रेय आदर्श संपादक माननीय श्री अनिलजी अग्रवाल यांना जाते.” असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

    याप्रसंगी माननीय श्री अनिलजी अग्रवाल यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवरांसह त्यांचे शेकडो प्रेमी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी आले होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.