✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील काही घटक दूर असतात त्यांना पण दिवाळी चा आनंद घेता यावा…त्यांची पण दिवाळी गोड व्हावी या साठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील गरीब ,विधवा,परित्यक्त्या,अनाथ,दिव्यांग,एक पालकत्व ,दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनीना *भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेड (BKBC TRUST) तर्फे एक *कलरफूल ड्रेस ,फराळ,मिठाई व सुगंधी तेल* वाटप करण्यात आले.
त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदमय झाली.कार्यक्रमा साठी कांकरिया ट्रस्ट च्या मंजूताई दर्डा,तहसीलदार प्रदीप शेलार सर,गटशिक्षण अधिकारी ठुले सर,प्रताप भोसले,विस्तार अधिकारी लटपटे सर,केंद्र प्रमुख फड सर,पूजा दर्डा,सिद्धार्थ दर्डा,चामे सर,मुख्याध्यापिका सोमवंशी मॅडम,चिंचोलकर सर,वाघमारे सर,राठोड सर,तांदळे सर,खुणे सर,होळंबे मॅडम,भररिवणे मॅडम,यानपल्लेवार मॅडम,पायीकराव मॅडम,गायकवाड मॅडम …आदींची उपस्थिती होती.*कांकरिया ट्रस्ट च्या मदती मुळे…कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथील विद्यार्थिनिंची दिवाळी साजरी होणार आनंदाची..!!”*