✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-पंचायत समिती यांच्या अंतर्गत-उमेद अभियान सुरू असून दत्तात्रय स्वयंसहायता महिला बचत गटाच्या आजीबाई स्वतःच्या हाताने बनवलेल्या घरातील शोच्या वस्तू बनवत असतात. उमेद अभियान या प्रदर्शनातून नागरिकांनी आमच्या वस्तू पहाव्या यातूनच महिलाचे सक्षमीकरण सुद्धा होईल व त्यांच्या महिलांच्या हाताला रोजगार मिळेल या प्रदर्शनात आम्ही पाहण्यासाठी आणलेल्या वस्तू या घरगुती असून शुद्ध गावरान आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकलआढळून येणार नाही असे दत्तात्रय महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माधवी लोखंडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली.
उमेद अभियानांतर्गत एकूण दहा महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून या प्रदर्शनात धनश्री महिला बचत गट मसला,बारा इमाम स्वयंसहायता महिला बचत गट खादगाव,मोहियोदिनसाब स्वयंसहायता महिला बचत गट बडवणी,सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गट झोला,यशश्री स्वयंसहायता महिला बचत गट कोद्री,बिस्मिल्ला स्वयंसहाय्यता महिला बचत गट कोद्री,पेडजाई स्वयंसहायता महिला बचतगट इसाद,यशवंती स्वय सहायता महिला बचत गट इसाद,भक्ती स्वयंसहायता महिला बचत गट मसला इत्यादींनी सहभाग नोंदवीला असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सरस्वती शिंदे,बेगम युनूस शेख,हिनाकौसर बकश पठाण,दीक्षा सावंत,शिवानी सोनटक्के,उषा लटपटे,सय्यद शबाना,माधवीताई लोखंडे, शालन लाकडे इत्यादी परिश्रम घेत आहेत.