वयाच्या पाचव्या वर्षीच ‘तो’ वाचतो फाडफाड ‘इंग्रजी’

    273

    ?आई-वडीलांकडून मिळाले शिक्षणाचे ‘संस्कार’

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.8नोव्हेंबर):-आपल्या मुलाला शिस्त लागावी. नवनवीन गोष्टी शिकून त्यांच्या ज्ञानात भर पडावी. तसेच त्याला बोली भाषेबरोबरच इंग्रजी भाषेचेही आकलन व्हावे, या उद्देशाने मौजे.इसाद येथील प्रभाकर अच्युतराव सातपुते यांनी मुलगा संस्कार यास हॉ.रत्नाकर गुट्टे स्कूलमध्ये प्रवेश घेतला. परिणामी, अभ्यासाची गोडी असलेला संस्कार भरपूर अभ्यास करतो. त्यामुळे तो वयाच्या केवळ पाचव्या वर्षी इंग्रजी फडाफड वाचतो आहे.

    संस्कार हा सुरूवाती पासून इतर मुलांपेक्षा चंचल आहे. त्यामुळे त्याला इंग्रजी शाळेत घालण्याचा निर्णय त्याच्या आई-वडीलांनी घेतला होता. तो निर्णय संस्कारने सार्थ करून दाखविला आहे. इंग्रजी भाषेत संस्कार कमालीचा हुशार आहे. पाचवीच्या मुलांला देखील वाचला न येणारे इंग्रजी भाषेतील शब्द तो सहजरित्या वाचतो, हे सांगितले नंतर कोणालाही नवल वाटेल हे नक्कीच.

    आज लहानांपासून मोठ्यापर्यंत इंग्रजी बोलण्याच्या वाचण्याच्या जणू काय स्पर्धा सुरु आहेत. त्यामुळे पालकांकडून देखील मुलांमध्ये गुण यावे यासाठी नामांकित इंग्रजी शाळेत घातले जाते. अशावेळी संस्कार सारखी मुले आई-वडीलांचा हेतू यशस्वी करतात. तेव्हा त्यांना मुलाचा अभिमान वाटत असतो. तसा शाळेलाही आनंद होतो.केवळ पाच वर्षांचा असलेला संस्कार इंग्रजीचे स्पष्ट वाचन करतो. प्रत्येक शब्द लगेच लक्षात ठेवतो. त्याला कोणतीही कविता लगेच तोंडपाठ होते. त्यामुळे संस्कारचे कौतुक केले जात आहे. कारण, पाच वर्षाचा चिमुकला इतके स्पष्ट वाचु शकतो, हे नवलच आहे.

    यापूर्वी गावात आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. त्यामुळे अगदी बोलक्या वयापासून संस्कारच्या कानावर इंग्रजी भाषेचे शब्द पडत गेले आहेत. परिणामी, तो इंग्रजीत हुशार झाला आहे, अशी स्पष्टोक्ती पालक प्रभाकर सातपुते यांनी दिली.

    दरम्यान, संस्कारच्या इंग्रजी विषयक ज्ञानामुळे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, माजी नगरसेवक फिरोजभाई पटेल, ॲड.अनिल सावंत, जेष्ठ मुख्याध्यापक माणिक नागरगोजे, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, जयशिल मिजगर, कवी विठ्ठल सातपुते, ॲड.राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले, उध्दव सातपुते, रामेश्वर भोसले, महेश किरडे, हरिओम जाधव, महेश पौळ, चिंतामणी सातपुते, शाम ठाकूर, अश्विन कदम, गोपीनाथ नेजे, दुर्गेश वाघ, गणेश मिजगर यांनी पेढे भरवून कौतुक केले आहे.
    तर इंग्रजी सोबत मराठी सुध्दा गरजेची – वैष्णवी सातपुते
    इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या मुलांचा मराठी भाषेची फारसा संबंध येत नाही. अशा मुलांची मराठी बाबतीत पुढे तारांबळ होतो. त्यामुळे मी संस्कारला दररोज इंग्रजी सोबत मराठी सुध्दा आवर्जून शिकवते. कारण, इंग्रजी सोबत मराठी सुध्दा गरजेची आहे, असे आई वैष्णवी सातपुते यांनी सांगितले.