Advertisements
✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगाव(दि।9नोव्हेंबर):-खामगाव येथील समर्थ बाळापुरे यांची तालुका क्रीडा संकुल चा शालेय विद्यार्थी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच अकोला येथे संपन्न झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तालुका क्रीडा संकुल व अंबिका क्रीडा मंडळ खामगाव येथे सराव करणारा विद्यार्थी समर्थ अजय बालापुरे यांनी सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये याची निवड झाली आहे हा विद्यार्थी आपले यशाची श्रेय खामगाव तालुका क्रीडा संकुल चे क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव व क्रीडा मार्गदर्शक राजेश सोनले व महेंद्र भाऊ रोहनकार कुनाल सोनले यांना देतात