✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 9 नोव्हेंबर):-तालुक्यातील ग्रा.पं. बाळदी येथील सन 2020 ते आजपावेतो अंपग लाभार्थ्याना निधी न मिळाल्याचा बाळदी ता. उमरखेड प्रवीण इंगळे (प्रहार शाखा प्रमुख) व अन्य यांची तक्रार अर्ज दिनांक 30/11/2023 प्राप्त दि.7/11/2023 रोजीग्रामपंचायत बाळदी येथील अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी 2020 ते आजपावतो मिळाला नसल्याबाबतची तक्रार या कार्यालयास सादर केला असून सदर पत्रानुसार आपण तात्काळ कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची प्रत परस्पर अर्जदारास देण्यात यावी.
व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा बिलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
विलंब झाल्यास अथवा काही नकार निर्माण झाल्यास होणा-या कार्यवाहीस आपणास सर्वस्वी जवाबदार धरून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी लेखी पत्रात नमूद केले आहे.
आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) जि.प. यवतमाळ यांना माहीतीस्तव सादर इंगळे व इतर रा. बाळदी ता. उमरखेड जि.यवतमाळ यांना माहीती करीता रवाना केली आहे.त्यामुळे तक्रारदार प्रविण इंगळे (प्रहार शाखा प्रमुख बाळदी) यांच्या सह इतर पदाधिकारी अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी लवकर वाटप करा या मागणीला यश मिळाले आहे. म्हणून प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.