फुले वाडा ते जिजाऊ लाल महालापर्यंत विश्वसम्राट बळीराजा गौरव मिरवणुकीत सर्वांना कृषी धन वाटप करीत घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

    197

    सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

    म्हसवड : सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यातून सकाळी 11 वाजता विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी सुरू करून जिजाऊ लाल महालात सर्वांना कृषी धन वाटप करीत दुपारी 3 वाजता समाप्त करण्यात आली.लवकरच 2024 ची निवडणूक येणार असल्याने प्रत्येक चौका चौकात बळीराजाला कार्यकर्ते मोठे पुष्पहार व कृषी धनाचे हार घालून तसेच फटाकड्याच्या माळांची आतशबाजी करीत स्वागत करीत होते.आज सत्यशोधक वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती असल्याने त्यांचा,मुक्ता साळवे आणि सर्व महापुरुषाच्या व विश्व सम्राट बळीराजाच्या नावाने जयघोष करीत सर्व परिसर घुमघुमला होता.यंदाचे 20 वे वर्ष होते.
    यावेळी प्रथम सामाजिक कार्यकर्ते ॲड. शारदा व मोहन वाडेकर यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक खास उदगीर वरून आलेले पाटील साहेब आणि सत्यशोधक सचिन बागडे यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
    यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिका प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की सरकार शेतकरी मालाला योग्य भाव देत नसून शेतीला पाणी ,वीजपुरवठा ,योग्य प्रकारे मोफत शिक्षण देखील नीट देत नाहीत.लवकरच 2024 निवडणुका येत असून शेतकरी राजाने त्यांना त्यांची जागा दाखवून वामन संस्कृतीचा नायनाट करू या तरच बळीच राज्य येईल म्हंटले.बळीराजाच्या काळात शेतकरी ,महिला अत्यंत सुखी होते म्हणूनच दीपावली सण साजरा करताना महिला वर्ग आवरजून ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो ही म्हण म्हंनताना तसेच ग्रामीण भागात घरा समोर अंगणात रांगोळी काढताना उल्लेख करताना आढलतात असे देखील परदेशी म्हणाल्या.
    ऍड.मोहन वाडेकर, किशोर ढमाले,विठल सातव,रमेश राक्षे, सचिन बगाडे,संतोष शिंदे व इतर मान्यवर म्हणाले की आज बहुजन समाज जागा होत असल्याने बळीराजाचा खरा इतिहास माहिती करून घेऊ लागला आहे आणि वामन कथा ही भाकडकथा लोकांच्या माती कशी मारली हे देखील सांगितले.तसेच केरळ ,तामिळनाडू सारखे बळी महोत्सव पुण्यात मोठ्या प्रमाणात साजरा करून बळीराजाच राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न करू या असे देखील म्हंटले.
    यावेळी बळीराजा वेशभूषेत ढोक म्हणाले की नुकतेच मुलींची पहिली शाळा सुरू झाली तो भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी विविध संघटनानी लढा दिला त्यामधे सत्यशोधक महासभेचा देखील खारीचा वाटा असून आम्ही त्या आदोलनात नेहमी सहभाग घेतलेला आहे.या सर्वांच्यां लढयामुळे नुकतेच सुप्रिम कोर्टाने देखील ती जागा पुणे मनपाने तातडीने ताब्यात घावी असे आदेश देऊन योग्य प्रकारे पुढील कामकाज करण्यासाठी सरकारला देखील आदेश दिलेत. ते यथोचित स्मारक होताना सरकार तज्ञ मंडळी नेमतील त्यामधे प्रा .प्रतिमा परदेशी यांचे नाव अग्रभागी असावे असा ठराव मांडला असता सर्वांनी हात उंचावून अनुमोदन दिले.
    या कार्यक्रमासाठी मोलाची मदत सागर आल्हाट, प्राची दुधाने, महेश बनकर,राजेंद्र शेलार, नवनाथ लोंढे ,वामन वळवी, आकाश व क्षितिज ढोक , नाथा परदेशी यांनी केली.
    लाल महालात जिजाऊ यांच्या पुतळ्यास बळीराजा यांचे शुभहस्ते तर बाल शिवबा पुतळ्यास सत्यशोधिका आशा ढोक यांचे हस्ते पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर बुळढाण्याचे शाहीर सय्याजी पाटील यांनी बळीराजाचा पोवाडा गाऊन लोकांमधे नवचैतन्य निर्माण केले.त्यानंतर सांगता प्रसंगी सर्वांना पानसुपारी , दिवाळी फराळ वाटप करण्यात आली.विविध पुरोगामी संघटना पदाधिकारी ,प्रतिनिधी आणि सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या अनेक विद्यार्त्यानी सहभाग घेतल्याने ही मिरवणुक मोठ्या दिमाखात साजरी झाली.