गडचिरोली येथे विदर्भस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन

    99

     

    गडचिरोली:

    झाडी बोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने १९ तारीख रविवारला परिश्रम भवन आरमारी रोड, गडचिरोली येथे कविसंमेलनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा.पद्मश्री डॉ.परशुरामजी खुणे यांचे हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी मा.बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रपूर हे भुषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शिवनाथजी कुंभारे ज्येष्ठ समाजसेवक गडचिरोली, प्रा.विलास खुणे शिवाजी महाविद्यालय गडचिरोली,
    मा.विलास निंबोरकर सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली, मा.धनंजय वाकुलकर नायब तहसिलदार आरमोरी यांना पाचाणार केले आहे. या कविसंमेलनाचे निमंत्रित कवी म्हणून भुमरीकार अरूण झगडकर गोंडपिपरी, मोरगाडकार लक्ष्मण खोब्रागडे मुल, गझलकार दिलीप पाटील राजुरा, रत्नमाला भोयर, शशिकला गावतुरे मुल, सत्तू भांडेकर, गझलकारा अपर्णा नैताम नागभीड, संतोष मेश्राम सिंदेवाही, संजय कुनघाडकर चामोर्शी, चेतन ठाकरे आरमोरी, डॉ.प्रविण किलनाके, गजानन गेडाम, वर्षा पडघन, डॉ.देवेंद्र मुनघाटे, अॅड.संजय. ठाकरे, गजानन गेडाम, गडचिरोली हे कवी उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात वेळेवर येणाऱ्या कवींनासुध्दा कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तरी कवी, रसिकांनी या संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन झाडीबोली मंडळाचे पदाधिकारी डॉ.चंद्रकांत लेनगुरे, कमलेश झाडे, विनायक धानोरकर, संजीव बोरकर, मारोती आरेवार, मालती सेमले, प्रतिक्षा कोडापे, उपेंद्र रोहणकर, पुरूषोत्तम ठाकरे, जितेंद्र रायपुरे यांनी केले आहे. अशी माहिती आमच्या न्यूज ऑफिसला श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी अवगत करून दिली आहे.