विकास कामांमुळे गंगाखेडचा कायापालट : आ.डॉ.गुट्टे गौरक्षण सभामंडप भूमिपूजन: १ कोटी ३३ लाख मंजूर

    111
    Advertisements

     

     

    अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी

    गंगाखेड (प्रतिनिधी):- शहरातील प्रत्येक भागातील रस्ते, ड्रेनेजलाईन, पथदिवे आदी प्रलंबित कामे पूर्ण करीत आहोत. लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी, शहरात सर्वत्र विकास कामांचा धडाका सुरू असून, त्यामुळे गंगाखेडचे रूपडे पालटले जात आहे, असे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.
    शहरातील गौरक्षण सभामंडपाचे भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजना अंतर्गत गौरक्षण सभामंडप बांधकाम करणे, यासाठी १ कोटी ३० लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे.
    गौरक्षण संस्थान हि सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. भूतदया आणि पशु प्राण्यांची काळजी घेण्याच्या हेतूने संस्था उभी राहिली आहे. स्थापनेपासून अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबविले आहेत. भविष्यात सुध्दा सामाजिक बांधिलकी जोपासून संस्था कार्य करेल, असा मला विश्वास आहे, असे आ.डॉ.गुट्टे म्हणाले.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरक्षण संस्थानचे विश्वस्त लक्ष्मीकांत जब्दे, जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप आळनूरे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, जेष्ठ व्यापारी विष्णु काका डाड, जेष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, सामाजिक कार्यकर्त्या मंजुषाताई दर्डा, ॲड. नंदकुमार काकाणी, राम मिरखे, राजेभाऊ बापू सातपुते, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, कृउबा. संचालक माणिकराव आळसे मामा, प्रवीण काबरा, डॉ. आळनुरे, प्रा.मुंजाजी चोरखडे सर, सचिन महाजन, उध्दव शिंदे, वैजनाथ टोले, दिपक तापडीया, उध्दवराव चोराडे, सतिश घोबाळे, संजय पारवे, सचिन नाव्हेकर, संदीप राडोठ, संतोष पेकम, ॲड.अशोक कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.