मुंबई दि (प्रतिनिधी) विहार लेक नजीक पवई येथील हॉटेल टुरिस्ट अल्पवईन मुलींच्या वासनाकांडा चा अड्डा बनला असून चालक रवी शेट्टी मालक अशोक राय यांच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी तक्रार विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पोलीस आयुक्ताकडे केली आहे.
हॉटेल चालक रवी शेट्टी यांनी अल्पवईन मुलींना शारिरीक संबंधासाठी खोल्या दिल्या जात असल्याची कबूली दिल्याचा विडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे. हि घटना फार निदनीय असून भारतीय संस्कृतीला काळीम्बा फासण्याचे कृत्य या लोकांकडून केले जातं असल्याचा गंभीर आरोप डॉ. माकणीकर यांनी केला आहे.
सदरील हॉटेलात ग्राहकाला दारू पुरवली जाते, पालिका आधीकारी व पोलिसांना पाळले जाते, त्यांना दरमहा पाकिटे पोचवली जातात. पालिका आयुक्त, अन्य अधिकारी, ACP, DCP, सिनियर, बीट मार्शल व हवालदाराणा खुश करण्यात येत असल्याचे रवी शेट्टी यांनी सांगितले आहे.
पॅन्थर डॉ. माकणीकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि, स्थानिक पोलीस तपासाऐवजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत हॉटेल प्रकरणी चौकशी व्हावी. रवी शेट्टी व अशोक राय यांचे मोबाईल वरून किती व कोण कोणत्या अधिकाऱ्यांना कॉल्स जातात
व या आधी गेले आहेत याची कॉल डिटेल्स तपासावी व अश्या कर्तव्यस्त कसूर अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबणं करावे व वंशावळ संपत्तीची चौकशी करावी.
तसेच पालिका अधिकाऱ्यांना व पोलिसांना तक्रार देऊनही अद्याप कसलीच कारवाई होत नाही म्हणजे रवी शेट्टी हणतो त्याप्रमाणे खरच अधिकाऱ्यांना मॅनेज कारतो का याचा तपास घ्यावा, शिवाय के. अशोक राय याचे पासपोर्ट तपासून पाहावे दुबई कितीदा व का गेला याचा शोध घ्यावा. आणि पालिका अधिकारी थोरात यांचे कर्तव्यात कसूर प्रकरणी निलंबणं करण्यात यावे असेही डॉ. माकणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
अनधिकृत स्टुडिओ, विनापरवाना 14 खोल्या बांधून अधिकाऱ्यांना खिशात ठेवण्याची भाषा करणाऱ्या रवी शेट्टी व अशोक राय कडून माझ्या खुणाची डी कंपनीला सुपारी दिली असल्याची खात्रीलायक बातमी असून पोलीस संरक्षणाचीही डॉ. राजन माकणीकर यांनी मागणी केली आहे.