✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.982395466
ढाणकी (दि. 24 नोव्हेंबर)
जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, यवतमाळ
यांना ढाणकी शहरातील सर्व पक्ष राजकीय नेते पदाधिकारी आणि गावातील समाजसेवकांनी निवेदन देत उपरोक्त ठाणेदार म्हणून बिटरगाव पोलिस स्टेशन ठाणेदार सुजाता बनसोड यांची बदली त्वरित करण्याची मागणी केली आहे.
गावातील सन्मानीत लोकासह सामान्य लोकांना उध्दट वर्तणुक, सार्वजनिक सन उत्सवा दरम्यान शांतता समितीवर अविश्वास, पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात मोठया प्रमाणात गावठी दारु, मटका, गुटखा, अवैध धंदे व मेन चौकाततील वाहतूक जाम समस्या यावर प्रतिबंध घालण्यात ठाणेदार सुजाता बनसोड अपयशी ठरल्या आहेत.
आणि या धंद्यावर ते जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
असे प्रश्न उपस्थित करत रवि जाधव या पोलिस कर्मचाऱ्याचे (सी.डी.आर) रिपोर्टवर ताबा ठेवतो. रवि जाधव हे ठाणेदार बनसोड यांचे पती आहे.
हे पोलिस कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनात भरपुर माया कमवित असल्याची शंका असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी.
तसेच कर्तव्य चोख बजावनाऱ्या जमादार मोहन चाटे यांची करावी व प्रकरणचे निवेदन देणाऱ्या नागरिकांच्या विरोधात अवैध धंद्यात हितसंबंध असणाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल होवु नये तसेच सबब निवेदन देणाऱ्यांना, शासनाकडून सुरक्षा देण्याची मागणी करत पाच दिवसात निर्णय न घेतल्यास, लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा देत सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस प्रशासन स्वतः जबाबदार राहील.. आमच्या गावाची कायदा, सुव्यवस्था,शांतता कायम राखण्यासाठी या मागणीला गांर्भीयाने घेत ठाणेदार महोदयांची तात्काळ बदली करण्यात यावी.
अशी मागणी ढाणकी शहरातील सर्व पक्ष राजकीय नेते पदाधिकारी आणि गावातील समाजसेवकांनी केली आहे.
यावेळी सुरेशजी जयस्वाल नगराध्यक्ष ढाणकी, बाळासाहेब चंद्रे पाटील सभापती कु. उत्पन्न बा समिती, करण भरणे जिल्हा उपाध्यक्ष भीम टायगर सेना, दत्त दिगंबर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, आनंदराव चंद्रे पाटील ज्येष्ठ नेते भाजपा, संजय कुंभरवाड शिवसेना तालुका प्रमुख, सादिक शेख तालुका अध्यक्ष म न से,शेख जहीर जमीनदार मा. उपाध्यक्ष न प ढाणकी, गणेशराव नरवाडे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, रमेशराव गायकवाड मा. जि प सदस्य, बंटी जाधव शहर प्रमुख शिवसेना ढाणकी, रोहित वर्मा शहर प्रमुख भाजपा ढाणकी, भास्कर चंद्रे पाटील शहर अध्यक्ष राष्ट्रवादी ढाणकी, सय्यद माजिद तालुका प्रमुख प्रहार, अमोल तुपेकर शहराध्यक्ष काँग्रेस, रुपेश भंडारी तालुका अध्यक्ष व्यापारी महासंघ, प्रवीण मिराशे तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट, सुदर्शन रावते तालुकाध्यक्ष भाजपा उमरखेड, उमेश योगेवार नगरसेवक न. प ढाणकी,कृष्णा मुखिरवाड ,सुनील कदम उपस्थित होते
—-
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कोणतेही अवैध धंदे सुरू नाहीत. जर कुठे लपून चोरून सुरू असतील तर, सज्ञान नागरिकांनी याविषयी माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करते.