अनिल साळवे,प्रतिनिधी
गंगाखेड( प्रतिनिधी) गंगाखेड येथील जायकवाडी येथे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करत संविधान दिन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, व बार्टी जिल्हा परभणी बार्टीचे महासंचालक सुनील वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली “२६नोव्हेंबर संविधान दिवस’ते ०६डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस समतापर्व-२०२३”अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच भाग म्हणून आज संविधानदिनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिनाचे महत्त्व व भारतीय राज्यघटनेनं भारताच्या सामाजिक,राजकीय शैक्षणिक, जीवनाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदाय राहिलेलं आहे असे मत बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.बार्टी च्या वतीने करत असलेल्या कामाविषयी माहितीही देण्यात आली. या प्रसंगी वसतिगृहाच्या प्रमुख वाय. आर.परेलू,शुभांगी ऍंगडे,ए आर मेहत्रे, आर व्ही खोडवे व विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती