जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू-संतोष मुरकुटे (भा. ज. पा. ग्रामीण जिल्हा अध्यक्ष )

    128
    Advertisements

     

    अनिल साळवे,प्रतिनिधी

    गंगाखेड (प्रतिनिधी )गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची चाललेले दादागिरी मोडीत काढण्यासाठी वेळ प्रसंगी जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून असे वक्तव्य परभणी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी रात्री गंगाखेड शहरातील त्यांच्या निवासस्थानी परिसरातील मैदानात अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी केले. गंगाखेड विधान सभेचे विद्यमान आमदार यांनी आपले स्पर्धक संपवण्याच्या उद्देशाने गंगाखेड विधानसभा मतदार संघातील दादागिरी व पैशाचे आमिष देऊन सुरू केलेले फोडाफोडीचे राजकारण व खोट्या नाट्या आरोप, गंगाखेड विधानसभा लढवणाऱ्याला इच्छुक उमेदवार व विद्यमान अमदार यांच्यात आरोप प्रतीआरोप होत असल्याने निवडणूक पूर्वीच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आत्तापासूनच वातावरण तापलेले दिसून येत आहे. यावेळी उपस्थित माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,माजी आमदार मोहन फड, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राजेश फड,माधवराव फड (Jldi)माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, विलास बाबर,व्यंकटराव तांदळे, मनसेचे बालाजी मुंडे, डॉक्टर विद्याताई चौधरी,भाई ज्ञानोबा मुंडे, भगवान सानप, रिपाईचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, विठ्ठल मामा, मनोहर महाराज केंद्रे, डॉक्टर सुभाष कदम, गोविंद यादव,आदी मान्यवराच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम पार पडला यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते