गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झालेली आहे, त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जिवही जात आहे सोबतच अनेक गावांची आणि शेतीची नुकसान होत असल्याने जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने वारंवार मागणी करूनही वनविभाग, पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी यावर अद्यापही तोडगा न काढल्यामुळे आता थेट वनमंत्र्याच्या घरासमोर गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम भवन, गडचिरोली येते बैठक पार पडली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, , युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, किसान काँग्रेस अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, भैय्याजी मुद्दमवार, प्रशांत कोराम, प्रभाकर कुबडे, घनश्याम मुरवतकर, राजाराम ठाकरे, श्रीकांत कथोटे, रामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, योगेंद्र झंजाळ, नृपेश नांदनकर, उत्तम ठाकरे, प्रफुल आंबोरकर, नितेश राठोड, जावेद खान, सुदर्शन उंदीरवाडे, निकेश कामीडवार, नेताजी गुरनुले सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*The main demands of the movement will be*
:
Wild elephants and man-eating tigers should be dealt with immediately, substantial financial assistance should be given immediately to the families of those injured and killed in attacks by elephants, tigers or any other wild animals. Financial assistance of at least 25,000 should be done without imposing any oppressive conditions by making Panchnama of farms and houses damaged in the attack of wild animals. The forest guard should be charged under Bhdvi 302, the forest department should be provided with sophisticated drone cameras to trace the location of elephants and tigers.
District President Mahendra Brahmanwade has informed that if these demands are not met, a grand march will be taken out on behalf of the District Congress in the coming winter session at the Nagpur Vidhan Bhavan.
या असणार आंदोलनातील प्रमुख मागण्या:
जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी. जंगली प्राण्यांच्या हल्यात नुकसान झालेल्या शेती आणि घराचे पंचनामे करून कुठल्याही जाचक अटी न लादता सरसकट किमान 25 हजाराची आर्थिक मदत करण्यात यावी, वनपट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे, वनविभागाच्या निष्काळीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने वनअधिकाऱ्याना गृहीत धरून मुख्य वनरक्षक आणि उपमुख्य वनरक्षकावर भादवी 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, हत्ती आणि वाघाचे लोकेशन ट्रेस करण्याकरीता वनविभागाला अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा ची व्यवस्था करून देण्यात यावी.
या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्हा काँग्रेसच्या वतीने नागपूर विधानभवनावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.