सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : महाराष्ट्र राज्य एम. एड. एम. ए. एज्युकेशन प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हा कार्यकारिणीची निवड सभा 21 नोव्हेंबर 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील एम ए डी एम एज्युकेशन सभासदांची सभा, राज्याध्यक्ष माननीय प्रदीप शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यावेळी राज्य कोषाध्यक्ष श्री. भीमराव पाटील, सरचिटणीस बिपिन साळवे, कार्याध्यक्ष विजय जाधव व राज्य महिला प्रतिनिधी सौ. अंजली कट्टे यांच्या उपस्थितीत व बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली यामध्ये पुढील प्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली सातारा जिल्हा अध्यक्षपदी राजाराम तोरणे, सरचिटणीस शरद नेवसे, कार्याध्यक्ष सतीश ढमाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र खाडे, संपर्कप्रमुख बाबासाहेब थोरात, प्रसिद्धीप्रमुख हेमंत जाधव, उपाध्यक्ष प्रदीप भिसे, उपाध्यक्ष माधुरी सोनवलकर, संघटक केशर माने, मेघा चव्हाण यांची निवड करण्यात आली,
अशा रीतीने उत्साहवर्धक वातावरणामध्ये जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली नूतन वाटचालीस कार्यकारिणीचे अभिनंदन तालुकाध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.