महागाव तालुक्यातील धनोडा व हिवरा बीट मधील अवैध धंदे त्वरित बंद करा – भीम टायगर सेना ची मागणी

    249
    Advertisements

     

    ✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

    महागाव (दि. 29 नोव्हेंबर) तालुक्यातील धानोडा व हिवरा बीट मधील अवैधरित्या खुलेआम सुरू असलेला मटका, जुगार, गुटखा आणि रेती इत्यादी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

    यामुळे तरुण पिढी वाईट मार्गाला लागून आपले जीवन उद्ध्वस्त करून बरबाद होत आहेत.

    तसेच अनेक सुखी संसार या अवैध धंद्यामुळे संसाराची राख रांगोळी होताना दिसते. घराघरांमध्ये आज दारूसाठी, मटक्यासाठी आणि जुगारासाठी वाद,भांडण होत आहेत.

    त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती उत्खन करून जास्त किंमत लावून विक्री होताना दिसत आहे.
    परंतु सदर बाबींची कोणतीही दखल पोलीस प्रशासन किंवा महसूल विभागाने घेतलेली नाही.

    त्यामुळे अधिकच देश धडीला लागलेला आज मागासवर्गीय समाज यामुळे भरकटलेला दिसुन येत आहे.

    तरी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी धनोडा व हिवरा बीट मधील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे.

    अन्यथा महागाव पोलीस स्टेशन समोर भीम टायगर सेना सामाजिक संघटने करून आमरण उपोषण करण्यात येईल. यात उपोषणकर्त्याला जीवित हानी झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदारी राहील.

    असे शाम माधव धुळे जिल्हा (कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांच्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे.