डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन

    197
    Advertisements

     

    मुंबई, दि. 30 : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे.

    डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
    https://maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Digital_Advertising_Guidelines_03_11_23.pdf या लिंकवर हा प्राथमिक मसुदा उपलब्ध आहे. या मसुद्याबाबत अभिप्राय, सूचना आणि शिफारशी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत dgiprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.