✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 2 डिसेंबर) गोवंश जातीची जनावरे अवैधरित्या वाहतूक करणारे तीन वाहने महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ उभी असल्याची माहिती मिळाल्यावरून उमरखेड पोलिसांनी सदर वाहनांची शहानिशा करून त्या तिन वाहनातील गोवंश जातीचे गोरे ,म्हैस ,कालवड अशा प्रकारचे तिन वाहनातून 13 जनावरे आढळून आली तिन्ही वाहनाची व जनावरांची एकूण किंमत 5 लाख 56 हजार रुपये रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून चालकांना अटक करून जनावरांची गोशाळेत रवानगी केली.
येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते ईश्वर गोस्वामी यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला फोन करून तीन मालवाहू वाहने ज्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे कोंबून उमरखेड महागाव रोड वरील संजेरी धाब्या समोर उभी आहे असे सांगितले त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन वाहनाची तपासणी केली असता त्या तीनही वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आले तेव्हा तेथील तिनही वाहन चालकांना आपण करीत असलेल्या जनावरांची वाहतुकीची परवानगी व सदरील जनावरांचे दाखले आपल्याकडे आहेत का ? अशी पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी काही उत्तरे न देता कागदपत्रे सादर केली नाही तेव्हा सदर वाहन क्रमांक बोलेरो पिकअप एम एच 22 ए एन 1669 या क्रमांकाच्या वाहन चालक श्याम खंडारे रा खडका (लेवा फाटा) ता महागाव याच्या वाहनात गोंवंशजातीचे लहान-मोठे 3 गोरे , 1 म्हैस, 1 वगार असे 5 जनावरे आढळून आली या वाहनाची किंमत 3 लाख व जनावरांची किंमत 73 हजार असे एकूण 3 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल होता . त्यासोबत वाहन क्र दोन टाटा एस क्र .एम एच 26 ए डी 6491 याचा वाहन चालक स्वप्निल भगत रा खडका (लेवा फाटा ) ता महागाव या वाहनात 4 लहान मोठे गोरे मिळून आले या वाहनाची किंमत 50 हजार व 4 गोऱ्यांची किंमत 37 हजार असा 87 हजार रुपयांचा मुद्देमाल होता तसेच वाहन क्रमांक तीन टाटा एस क्र . एम एच 20 डी इ 2755 यामध्ये लहान मोठे 4 गोरे याची किंमत 34000 / रुपये व वाहनाची किंमत 60000 / रुपये असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर तिन्ही वाहनांच्या चालका विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार 11 ( I ) (G),11 (1) (D ),11 (1) ( C ), 11 ( I ) ( J ),महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा )अधिनियम 1995 नुसार 5अ , 5 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन ही वाहने जप्त करून चालकांना अटक करण्यात आली व जनावरे राजस्थानी सेवा समिती उमरखेड या संस्थेच्या गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेश्वर करीत आहे .