अनिल साळवे,प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी)- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय परभणी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने अभय केंद्र पुर्णा ऊसतोड कामगार जनजागृती सप्ताह निमित्ताने मा.जिल्हा संरक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार ऊसतोड कामगार पुरुष महिला आणि त्यांची अपत्ये यांना DvACT-2005 आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती कामाच्या ठिकाणी होणारा ञास याबाबतीत कायदेशीर मार्गदर्शन केले संबंधित ऊसतोडकामगारांना विधी सल्लागार श्रीमती मोतीकर मॅडम यांनी हितगुज करत मार्गदर्शन केले पुर्णा तालुका संरक्षण अधिकारी भरकड मदतीला पाथरी तालुका संरक्षण अधिकारी नागलवाड यांनी DvAct-2005 चे मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रीमती विद्या मेश्राम मॅडम समतादुत समाजकल्याण कार्यालय परभणी यांनी संबंधिताना त्यांच्या समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देत बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे सर,क्षेञिय अधिकारी चाईल्ड लाईनचे श्री ढगे,व गुंडे सर, ठेंगे कृषी सहाय्यक यांनी ही मनोगते व्यक्त करत ऊसतोड कामगारांच्या टोळ्या शासनाच्या माहिती देत सहकार्य केले. जनजागृती सप्ताहाच्या शेवटी ऊसतोड कामगार मजदुर त्यांच्या समस्या अडचणी जाणुन घेतल्या वस्तुस्थितीचा अहवाल सविनय सादर