चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसीचे अन्नत्याग आंदोलन – अतिरिक्त जिल्हाधिकारी व आमदार भांगडीया यांना निवेदन सादर

    200
    Advertisements

     

     

     

    सुयोग सुरेश डांगे,विशेष प्रतिनिधी मो.8605592830

    चिमूर – नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे. त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया यांना निवेदन देण्यात आले आहे.
    ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्यांग आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे २९ ऑक्टोमबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर बैटक आयोजित केली होती. परंतु अजूनही समस्या सुटल्या नसल्यामुळे ७ डिसेंबर २०२३ पासून ओबीसीच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूरच्या वतीने तहसील कार्यालयच्या बाजूला अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
    या बाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे व आमदार कीर्तीकुमार भांगडिया याना निवेदन देण्यात आले.