✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.11 डिसेंबर):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, श्याम रोकडे सर, काळबांडे सर आणि धम्मयात्रेचे संपर्कप्रमुख एम.डी कोकने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तर लगेच त्रिसरण पंचशील ग्रहण करून आपल्या धम्म यात्रेला सुरुवात केली. हा प्रवास उमरखेड येथून बुद्धगया बुद्ध दर्शन धम्मयात्रा 55 उपासक उपासिकांना घेऊन निघाली आहे.
विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन पाच हजार अनुयायांना बुद्धांच्या पवित्र धम्मात टाकले.
त्यामुळे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या 84 हजार स्तुप मधील उर्वरित राहिलेल्या ठिकाणांना भेट देण्याकरिता या धम्मयात्रा सहलीचे आयोजन केले होते.
सदर बुद्ध दर्शन धम्मयात्रा ही महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश नेपाळ बिहार या राज्यातील बौद्धस्थानाला भेट देऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊन शेवट नागपूर दीक्षाभूमी येथे भेट देऊन उमरखेड येथे संपन्न होणार आहे.
नागेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स उमरखेड या स्लीपर कोच गाडीमध्ये एकूण 55 (प्रवासी) उपासक उपासिका प्रवास करत आहेत.या सहलीचे संयोजक रमेश जाधव, एमडी कोकणे संपर्कप्रमुख उमरखेड, बबन काळे, मुकिंदा वाढवे यांनी केले आहे.