१७ डिसेंबरला डोमा येथे विरांगणा मुग्दाई जयंती व नागदिवाळी महोत्सव

    191
    Advertisements

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमुर(दि.14डिसेंबर):-प्रेरणादाई विरांगणा मुग्दाई आदिवासी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट डोमाच्या वतीने विरांगणा मुग्दाई प्रेरणास्थान पहाडी परिसर डोमा येथे दिनांक १७ डिसेंबरला विरांगणा मुग्दाई जयंती व नागदिवाळी महोत्सव तथा जेष्ठ समाजसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

    याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय कोअर कमेटी सदस्य वर्धा अखिल भारतीय धर्म परिषद भारतचे नारायणराव गजभे, प्रमुख पाहुणे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णाजी गजभे, चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सांदेकर, जि. प. चंद्रपूर माजी गटनेता डॉ. सतीश वारजुकर, राज्याध्यक्ष राहुल दडमल, देवनाथ नगराची, नेहरू माडवी, ग्रेस हमर, प्रा. जितेंद्र मिना, डॉ. बापी पंकज सिरका, मोनीलाल सोरेन, मेघलाल मुंडा, सुखदेव ठाकरु, विशाल नन्नावरे, विजय दांडेकर, अंकुशराव नन्नावरे, श्रीकांत एकुडे, बळीराम गरमडे, विश्वनाथ वाकडे, नरेश नन्नावरे, मंगेश धाडसे, प्रमुख मार्गदर्शक अॅड. नारायण जांभुळे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, डॉ. प्रा. भगवान नन्नावरे, गिताश्री उरॉव, देवकुमार धान, भंवरलाल परमार, भुवनसिंह कोराम, प्रेमशाही मुंडा, उत्तमभाई वसावा, डॉ. सुबोध हांसद, देवेंद्र कटारा, व्हिक्टर कुजुर, झोर झोकीम हमर, नवकुमार सरामिया, लालुभाई वसावा, डॉ. हिरा मिना, कार्तिक सिंग मुंडा, जवीस एम. टी. एफ. डी. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    यावेळी सेवानिवृत्त प्रा. वसंत जिवतोडे, सेवानिवृत्त हरि बारेकर, गंगागर नन्नावरे, नाजुकराव दडमल, सुरेश नन्नावरे, रामाजी दडमल यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

    कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. रामराव नन्नावरे, धनंजय दडमल, पुरुषोत्तम रंधये, सुरेश गायकवाड, गोवर्धन चौधरी, दशरथ नन्नावरे, अर्जुन कारमेंगे आदीने केले आहे.