✒️महागांव,तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)
महागाव(दि.20डिसेंबर):-जि.प. बाधकाम विभाग अंतर्गत पं.स. बांधकाम विभाग अंतर्गत येथे अभियंता असुन सदर अभियंता तळीराम असल्याने सतत मदिरा प्राशन करून कार्यालयाच्या कामकाजाला दांडी मारीत असतो बांधकाम विभागात रुजू झाला तेव्हापासुन ते आजतागायत त्यानी कुठल्याही गावचे काम केले त्या कामाला गुणवता दिसुन येत नाही .कामावर न जाता ऐष आराम करण्यात तो संपुर्ण दिवस मदिरा प्राशन करण्यात घालत असल्यामुळे त्याचे अनेक गावातील कामामध्ये गुणवत्ता दिसून येत नाही त्याचे कार्यकाळात दलित वस्तीसुधार योजना ,तांडा वस्ती सुधार योजना, २५/१५ आमदार फंड ,ठक्कर बाबा ,१४,१५ वा वित आयोग पांदन रस्ते ,समाजमंदिर व विविध योजनेचे काम करण्यात आले आहे.
या तळीरामने केलेल्या कामात गुणवत्ता दिसून येत नाही त्यानी मदिराला सर्वस्व माणून केलेल्या कामावर गेला नसल्याने झालेले मोजमाप पुस्तिकेत ऊत्क्रृष्ठ दाखवून काम पुर्ण झाल्याचे दाखवीले प्रत्यक्षात मात्र सिमेंट ते काम करताना ,माती मिश्रित रेतीचा वापर करण्यात आला तर सिमेंटचा अल्प प्रमाणात वापर करण्यालाआहे ,लांबी,रुंदी,जाडी कमी करण्यात आली आहे ,काम करताना शासनाचे सर्व मापदंड बाजुला सारुन अपहार करण्याचे उद्देश्य असल्याने त्यांनी सर्व कामे पदाचा दुरूपयोग करुण आपल्या अधिकारात निकृष्ट दर्जाचे करुन शासनाच्या तिजोरीला चुना लावला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे निकृष्ट दर्जाची व गुणवत्ताहीन आसुनही जी.प चे कार्यकारी अभियंता जानिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
सदर तळीरामने केलेली कामे मद्यधुंद अवस्थेत केले आहे सदर अभियंतेच्या कार्यकाळात कामाचे स्थळ बदलून अन्यत्र करने एवढ्या मोठ्या प्रमाणात या तळीरामचा गैरकारभार असुनही जी.प बांधकाम विभाग यांनी त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही न करता त्यांना जी.प बांधकाम विभागाचे काम करण्याचा प्रभार देऊन त्यांचा एक प्रकारे गौरवच केला आहे असे म्हणावे लागेल जी.प बांधकाम विभागामध्ये यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारचे निकृष्ठ कामे केली होती त्या कामाचे चौकशी करण्यासाठी अ.ग बनसोड समिति गठित केली होती सदर समितिने तत्कालीन काम केलेल्या अभियंत्यावर कामामध्ये गुणवत्ता नसणे अपाहार करने वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करने असे गंभीर आरोप लावले होते परंतु बनसोड समितिचा अहवाल रद्दबातल ठरवून दूसरी समिति गठीत करुण अंशता: दोषी दाखविण्यात आले होते.
त्याचप्रमाने तालंगकर समितिसुद्धा नेमुन या समितिने अनेक कामे गुणवताहिन दाखवून कार्यवाही करण्याची शिफारस केली होती परंतु जी.प बांधकाम विभागाला दोषींवर कार्यवाही न करण्याचा आजारच जडला असल्यामूळे त्याचीच रिओढत आताही कुठलीही कार्यवाही करत नाही त्यामुळे जी.प बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून जी.प बांधकाम विभाग म्हणजे अपहाराला खातपाणी घालणारी परिषद आहे असे अतिशोक्तीने म्हणावे लागेल महागाव प.स अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात निकृष्ठ दर्जची कामे होत असून व बेजबाबदारपणे व कर्तव्याला विसरुन दांडी मारुन राजरोशपणे मदिरा प्राशन करणारा तळीराम यांचेवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने जी.प विभाग निष्क्रिय ठरला आहे झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी होऊन गठीत केलेल्या समितिने दोषी असल्याचा आहवाल देऊन कार्यवाही करण्याची शिफारस करुनही जी.प कडून कार्यवाही होत नसल्याने एक सुज्ञ लोकांचे शिष्टमंडळ दोषींविरोधात कार्यवाही होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जनहितयाचीका दाखल करण्याच्या तयारीला लगला आहे