आव्हान 2023 शिबिरासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवकांची निवड

    345
    Advertisements

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.25डिसेंबर):- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवकांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील राज्यस्तरीय साहसी आव्हान 2023 शिबिरासाठी निवड झाली आहे.

    कु आरती मेश्राम कु. काजल थुटूरकर श्री स्वप्नील माहीनकर हे महाविद्यालयाचे दि २५ डिसें तें 03 जाने 24 साठी नेतृत्व करणार आहे. या शिबिरात भूकंप, पूर, आग सारखी आपतकालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात कशी करावी या विषयाचे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्याना निश्चीतच लाभ मिळेल असा आशावाद प्राचार्य डॉ आश्विन चंदेल यांनी व्यक्त केला. सोबतच निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. प्रफुल राजुरवाडे, डॉ. नितिन कत्रोजवार यांचे मार्गदर्शन लाभले. आव्हान साठी निवड झालेल्या रासेयो स्वयंसेवकांचे गांधी सेवा शिक्षण समिती अध्यक्ष डॉ. दिपक यावले तसेच सचिव विनायकरावजी कापसे यांनी विशेष अभिनंदन केले.