Advertisements
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.28डिसेंबर):- गंगाखेड शहरामध्ये 25 ते 30 वर्षापासून गौतम नगर येथील रहिवासी राहत असून या परिसरात नगर पालिकेच्या वतीने पाणी,लाईट व रोड नाल्यांची सुविधा पुरविण्यात येत असते परंतु या परिसरातील नागरिकांना घरकुला सारख्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा मिळत नाही.
त्यामुळे या गौतम नगरातील एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.विशाल साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद गंगाखेड यांनी गौतम नगरातील रहिवाशींना भोगवटदार नोंद घेऊन भोगवटदार पी.टी.आर. देण्यात यावे यातूनच यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागेल असे निवेदनावर लखनअण्णा साळवे,प्रा.जयपाल पंडित,प्रकाश हातागळे,बाळासाहेब साळवे,मुंडे,लखन साळवे,रमेश साळवे मोहन कांबळे,धम्मानंद साळवे गंगाधर गायकवाड,राजेश साळवे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.