शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात रंगले कविसंमेलन

    124
    Advertisements

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.3फेब्रुवारी):-जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.या वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. कविसंमेलनात विद्यार्थी,पालक आणि निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली. विविध विषयांवरील कविता याप्रसंगी कवींनी सादर केल्या.

    कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रकाश कोडापे होते. प्रमुख अतिथी म्हणून कवडू बारेकर, रामभाऊ मेश्राम, सुरेश सहारे, रामचंद्र सहारे, स्वप्नील श्रीरामे, हरिभाऊ रिनके, पंढरी श्रीरामे, प्रभाकर दोडके, मुख्याध्यापक सुरेश डांगे आदी उपस्थित होते.

    कविसंमेलनात कवी तलाशकुमार खोब्रागडे, मनोज सरदार, डॉ.शिलवंत मेश्राम, मुरलीधर चुनारकर या निमंत्रित कवींव्यतिरिक्त बरडघाट येथील सोनाली मेश्राम, प्रतिभा भोयर, वैशाली दोडके, बेबी भोयर,सोनाली बारेकर, निरंजना मेश्राम,सागर सहारे यांनी आपल्या कविता सादर केल्या. शालेय विद्यार्थी तेजस्विनी भोयर, अवनी श्रीरामे, साक्षी पोईनकर,वैष्णवी मेश्राम, प्रांशूल बारेकर,अंकित मेश्राम,लोभांशू मेश्राम यांनी कविता सादर केल्या.कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवी प्रकाश मेश्राम यांनी केले.

    प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले. आभार अर्चना डफ यांनी मानले.आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,गुरुदेव सेवा मंडळ सदस्य तथा ग्रामस्थांनी सहकार्य केले.