✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.3फेब्रुवारी):-साकोली येथील एकमेव मुलींची शाळा म्हणजे कलाबाई कन्या शाळा यामध्ये तालुक्यातील मुली शिक्षण घेण्याकरिता बाहेर गावून मुली येतात. आज मुलगी शिकावी म्हणून शासन नवी नवी योजना अंमलात आणते.
आज मुलींना झाशीची राणी, सावित्रीबाई फुले कसे करता यावे, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. मुलींना बर काय वाईट काय यांचे शिक्षण दिले पाहिजे. अशी कल्पना मनात सर्वांच्या आली पाहिजे. याकडे सर्वांनी लक्ष दिला पाहिजे.
या गोष्टी साठी फ्रिडम युथ फॉउंडेशन यांनी शाळाची भेट घेऊन पी. बी. चोले प्राचार्यशी भेट घेऊन शाळेला भेटवस्तू प्रदान केले. यावेळी उपस्थिती फ्रिडम चे अध्येक्ष किशोर बावणे, अमर खंडारे, आशिष गुप्ता, हेमंत चांदेकर, समीर सूर्यवंशी, स्वामी नेवारे, कार्तिक लांजेवार, चेतन हत्तीमारे, श्वेता तरजुले, शिवानी शहारे इ. फ्रिडमचे सदस्य उपस्थिती होते.