✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.3फेब्रुवारी):- तहसील कार्यालयातून दिले जाणारे शिधापत्रिका या ऑफलाइन (रेशन कार्ड पुस्तकाच्या स्वरूपात) दिल्या जात होत्या परंतु रेशन कार्ड संपल्यामुळे ऑनलाइन शिधापत्रिका दिल्या जात आहेत. शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की अंत्योदय, अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिका या मोफत देण्यात येतील, परंतु येथील पुरवठा विभागातून लाभार्थ्याला सांगण्यात येते तुम्ही महा-ई-सेवा केंद्रातून अर्ज करा.
या सेवा केंद्रातून अर्ज करताना लाभार्थ्याकडून 1500 ते 2000 रुपये उकळल्या जात आहेत. असे लाभार्थी यांच्याकडून बोले जात आहे.त्याच बरोबरच शिधापत्रिकेच्या कोणत्याही कामासाठी नाव कमी करणे, नाव वाढवणे, दुय्यम शिधापत्रिका इत्यादीसाठी पाच रुपयाची तिकीट लावून, स्वयं घोषणापत्र बंद करून ऑनलाइन शपथ पत्र बंधनकारक करण्यात आले असून, यासाठी सेवा केंद्र 200 रुपये आकारत आहेत. हे शपथपत्र बंधनकारक करण्याचा पुरवठा विभागाचा आठ्ठहास का? असा सवाल लाभार्थ्याकडून होत आहे.
पुरवठा विभागातून ठराविक दोनच महा-ई-सेवा केंद्रांची नावे लाभार्थ्यांना सांगतात जर दुसऱ्या ठिकाणाहून अर्ज केल्यास ते अर्ज अपात्र ठरविले जात असल्याचे बोलले जात आहे.
शिधापत्रिकेच्या ऑनलाईन अर्ज बाहेरून महासेवा केंद्रातून होत असताना, तहसील पुरवठा विभागातून त्या अर्जाला अप्रोवल देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून, ,(PHH) अन्नसुरक्षा योजनेत कार्ड टाकण्यात येत आहेत. जे कार्डधारक पैसे देत नाहीत त्यांचे NPH धान्य न मिळणाऱ्या योजनेत अप्रुव्हल करण्यात येत आहे. येथील तहसील कार्यालयात सिधापत्रीका संपल्याचे सांगत पुरवठ्यातीलच काही कर्मचारी मात्र दलाला करवी तीन-तीन हजार रुपयात कोरी सिधापत्रीका देत आहेत.
पुरवठा विभागातून व ऑनलाईन महा-ई-सेवा केंद्रातून लाभार्थ्याकडून दोन ते तीन हजार रुपये घेतले जात असल्यामुळे सिधापत्रीकाऑनलाईन अन्नसुरक्षा योजनेसाठी चे सविस्तर माहितीस्तव दरपत्रक, तहसील कार्यालयात लावण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.