भाळवणीत निकक्षय मित्र प्रशांत माळवदे यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी केला सत्कार

    182
    Advertisements

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.14फेब्रुवारी):-पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांचा हस्ते निकक्षय मित्र प्रशांत माळवदे यांचा शाल,श्रीफळ, हार,फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांचा सत्कार सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.नवले म्हणाले की, निक्षय मित्र योजना ही क्षयरोगाने ग्रस्त लोकांना दत्तक घेण्याची एक प्रकारची योजना आहे. या योजनेंतर्गत कोणतीही स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था किंवा संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतीही व्यक्ती टीबी रुग्णाला दत्तक घेऊ शकते, जेणेकरून त्याला योग्य उपचार मिळू शकतील. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असेही आव्हान यावेळी डॉ. नवले यांनी केले.

    यावेळी पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ.पिंपळे,माहिती अधिकारी शेख,डॉ.रेपाळ,डॉ.साळुंखे,सरपंच रणजित जाधव,वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील,रीपाई तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, रवि शिंगटे, अविंदा गायकवाड प्रकाश माळी,मेटकरी, गंगणे,कांबळे,आवळे आदि मान्यवर उपस्थित होते.