गुन्हे शाखेची मोठी कारवाई देशी कट्टा बाळगणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

    163
    Advertisements

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

    उमरखेड(दि.14 फेब्रुवारी):-गुन्हा करण्याच्या उद्देशाने देशीकट्टा बाळगुन असणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

    ही कारवाई मंगळवारी (ता.13) रात्रीच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेड हददीत मौजे महागांव-उरमखेड रोड लगत संजेरी हॉटेल समोर करण्यात आली.ताईफखान जहाँगिर खान रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

    प्राप्त माहीती नुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन संजेरी हॉटेल समोर, एक इसम हा संशयीतरित्या उभा असल्याचे दिसल्याने आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल (कटटा) व जिवंत काडतुस मिळून आल्याने जप्त करुन ताब्यात घेतली. सदर देशी बनावटीची पिस्टल (कटटा) कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता अमजद खान सरदार खान रा. वसंतनगर पुसद ता. पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले.

    वरुन नमुद ताईफखान जहाँगिर खान वय 21 वर्षे रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ याचे कब्जातुन एक देशी बनावटीची पिस्टल (कटटा) दोन जिवंत काडतुस असा 31,000/-रु चा माल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे. उमरखेड येथे भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असुन पुढील कार्यवाही साठी पो.स्टे. उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.