?आजच्या डीजे संस्कृतीला बाजूला सारून पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्या – उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड
सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466
उमरखेड(दि.14फेब्रुवारी):-पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली.आगामी काळात येणाऱ्या संत सेवालाल महाराज जयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य उमरखेड येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर तसेच मागील काळात घडलेल्या घटनाबाबत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली.
सदर बैठकीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी मराठा बांधव मुस्लिम बांधव पत्रकार पोलीस पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केले.