✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपुर(दि.20फेब्रुवारी):-कोरपना येथे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोरपनाच्या वतीने कोरपना तालुक्यातील शिक्षकांचा संघटना प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यात पुरोगामी समितीचे राज्य नेते विजयभाऊ भोगेकर व जिल्हा सरचिटणीस सुरेशभाऊ गिलोरकर, वासुदेव गौरकार ,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी आनंदराव धुर्वे , रविभाऊ सोयाम ,संदिप कोंडेकर , वहिद शेख , दौलतराव मरापे तथा मोररेश्वर बोंडे , पुंडलिक कौरासे , विश्वपती गेडाम , सुरेश आत्राम , रोहीदास राठोड यांच्या उपस्थितीत पुरोगामी समितीचे राज्य स्तरावरील, जिल्हा स्तरावरील कार्याने प्रभावित होऊन पुरोगामी समितीत काकासाहेब नागरे ,नामदेव गेडाम ,जंगु रायसिडाम ,संजय मरापे ,संदिप मुंडकर ,निलेश मडावी ,भाऊराव पंधरे,सत्यविजय मडावी ,शिवाजी नारे ,अजय राठोड ,बालाजी म्हेत्रे ,गजानन तिडके ,मेहरबान राठोड ,बालाजी नरवटे ,अशोक राठोड ,बंडु ताजने ,शेषराव येरमे ,भास्कर राजुरकर ,सोमेश्वर आमुगे ,अमोल मेश्राम ,.वासुदेव सोयाम ,गोपीचंद करंडे ,विनायक कन्नाके ,विलास किन्नाके ,शैलेंद्र जिवणे या प्राथमिक शिक्षकांनी जाहीररित्या प्रवेश घेतला आहे.
सदर कार्यक्रमात विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून निवड झालेले सन्माननीय विशाल बोधाने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विजय भोगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोरपना पुरोगामी शिलेदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.नवीन प्रवेश घेतलेल्या शिक्षकांनी आता सर्वांनी मिळून शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सतत प्रयत्नात राहू आणि पुरोगामी समितीला जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून देऊ. अशाप्रकारचा प्रण घेतला .त्यानंतर नवीन प्रवेशित काकासाहेब नागरे , नामदेव गेडाम ,संजय मरापे ,जंगु रायसिडाम सर इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच कार्यक्रमातील पाहुण्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची यशस्वीपणे सांगता करण्यात आली.
या संघटना प्रवेशाचा कार्यक्रम तथा स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुदेवराव गौरकार , कोरपना तालुकाध्यक्ष संतोष जुनगरी तसेच तालुका सरचिटणीस विनोबा आत्राम , गडचांदुर सोसायटीचे विद्यमान पदाधिकारी तथा संचालक आणि कोरपना पुरोगामी शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले.