✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.20फेब्रुवारी):-ईसापुर ते शेंबाळपिंपरी रस्त्याचे अखेर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे आ.इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की पुसद तालुक्यातील शेवटच्या टोकावर म्हणजे हिंगोली- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ईसापुर धरण ते शेंबाळपिंपरी हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्यात यावी या करिता गावातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले होते. त्या निवेदनाची बातमी दैनिक वृत्तपत्रात अनेक वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या प्रश्नाला वाचा फोडली त्या बातमीचा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आल्याने बातमीची दखल घेण्यात आली .
अखेर 17 फेब्रुवारी 2024 रोजी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 180.78 लक्ष रुपये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.व तसेच ईसापुर धरण येथील विश्वशांती बुद्धविहार वॉल कंपाऊंड च्या कामाचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले.
अनेक वर्तमानपत्रात बातमी प्रसारित करून बातमीची दखल घेऊन डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन झाल्या बद्दल सरपंच, कैलासराव नाईक ज्योतिबा थोरात यांनी वृत्तपत्राचे आभार मानले
या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाला कैलासराव नाईक,माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव ढोले, जिल्हा नियोजन समिती सदस्य सदबाराव मोहटे, सामाजिक कार्यकर्ते गौतम थोरात,भास्कर बैस, ज्योतिबा थोरात ग्रा.पं. सदस्य ईसापुर धरण, तंटामुक्ती अध्यक्ष,शाळा समिती अध्यक्ष,तसेच प्रतिष्ठित व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.