अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे पंढरपूर बसस्थानकावर प्रवासी दिन साजरा; चालक,वाहक यांचा गौरव

    152
    Advertisements

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.20फेब्रुवारी): – येथील बसस्थानकावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत व राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवासी दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार, तेज न्यूज चे प्रशांत माळवदे, अ.भा. ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल,तर अध्यक्ष स्थानी पंढरपूर आगार यंत्रशाळा सहा. अधिक्षक, विजय घोलप होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक सुमित भिंगे यांनी केले.

    जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी रथसप्तमी व प्रवासी दिन साजरा करण्यामागील उद्देश सांगताना ज्याप्रमाणे सूर्य अखंडपणे भ्रमण करतो त्याप्रमाणे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा अखंडपणे चालू असते त्यामुळे रथसप्तमी हा दिवस प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

    प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रशांत माळवदे यांनी एसटीच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करुन महामंडळाच्या अडचणी सोडवण्यासाठी पत्रकार म्हणून सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पत्रकारांना निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले .

    जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी सध्या मिळणाऱ्या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढलेली आहे. त्यासाठी नवीन ई बसेसची संख्या वाढविण्याची, तसेच बसस्थानकावर फलाटाजवळ स्वच्छतागृह वाढविण्याची व पाण्याचे एटीएम सुरू करण्याची मागणी केली.

    तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी इंदापूरमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बसेस नविन कराड नाका, लिंकरोड मार्गे सोडाव्यात अशी मागणी केली.यावेळी उत्कृष्ट प्रवासी सेवेबद्दल चालक,वाहक,कर्मचारी, अधिकारी तसेच रिक्षाचालक यांचा ग्राहक पंचायतीतर्फे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला.प्रवाशांना तीळगूळ वाटप करण्यात आले.

    अध्यक्षीय समारोपात विजय घोलप यांनी प्रवाशांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य पांडुरंग अल्लापूरकर, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शाम तापडिया,प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका सचिव प्रा धनंजय पंधे यांनी परिश्रम घेतले.समारंभाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन वाहतूक निरीक्षक नवनाथ दळवे यांनी केले,आगार प्रमुख मोहन वाकळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती विजया भूमकर, सोनिया थोरात यांनी उत्तम नियोजन केले होते.