दिव्यांगांच्या समस्या निकाली काढा अन्यथा आंन्दोलन

    136
    Advertisements

    ?विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनची मागणी

    ✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    खामगाव(दि.20फेब्रुवारी):-खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत समिती अंतर्गत दिव्यांगांच्या समस्यासाठी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने चंदनसिंग राजपुत प्रशाषक गट विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना आज दि.२०/०२/२०२४रोजी पुन्हा स्मरण म्हणुन विविध समस्याचे निवेदन सादर केले पंचायत समिती कार्यलयात दि ०५/०२/२०२४ रोजी विविध मागण्या संदर्भात निवेदन दाखल केले होते सबब त्याच निवेदनाच्या अनुषंगाने स्मरणपत्र म्हणून दिव्यांग सुरक्षा कायदा २०१६ ला अनुसरून हे पत्र दाखल करीत आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्या करिता आपण कुठल्याच प्रकारची कार्यवाही केल्याचे कळले नाही तरी आपल्या पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात आपणाकडे अंतिम सूचना निवेदन सादर

    १) दिव्यांग स्वनिधी ५३ वाटपामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींनी वर्ष २०२१ ते २०२४ आर्थिक वर्षाचे वाटप केलेले नाही त्यांच्या थकितसह आजतागत निधीचे वाटप करण्यात यावे २) काही ग्रामपंचायती मध्ये भेदभावपूर्ण वागणुक प्रमाणे निधी वाटप केला आहे तो सरसकट वाटपाचे ३१ मार्च २०२४ पुर्वी आदेशित करावे ३) घरपट्टीमध्ये दिव्यांग पालकांना ५०% करमाफीची सुट मिळत नाही ती देण्यात यावी ४) घरकुल मध्ये प्राधान्य लाभार्थी म्हणुन दिव्यांग आदेशित असतांनाही त्यांना स्थान देण्यात येत नाही त्यांना न्याय देण्याचे करावे ५) आपल्या कार्यक्षेत्रातील युडिआयडी प्रमाणपत्र धारक दिव्यांगांची यादी त्यांच्या टक्केवारीसह आम्हाला ऊपलब्द करुन देण्यात यावी व ती यादी प्रत्येक ग्रामपंचायतीला दर्शनी भागावर लावण्यात यावी ६) २०० फुट जागा ग्रामपंचायत हद्दीतील ती दिव्यांगाना उपलब्ध करून देणे

    [२] ७) दिव्यांग संरक्षण कायदा २०१६ अन्वेय येत्या पंधरा दिवसात दिव्यांग बांधवांना न्याय देण्यात यावा, ८) ग्रामपंचायत निहाय वाटप व न केलेले वाटप ५% निधी ची यादीही आम्हाला उपलब्ध करून द्यावी या निवेदनानुसार रास्त कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गेने आंन्दोलन करु व त्याची संपूर्ण जवाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहिल करिता हे निवेदन सादर केले सादर केलेल्या मागणी निवेदन ची दखल आपण आठ दिवसात न घेतल्यास भारतीय राज्य घटनेने दिलेल्या हक्क अधिकारानुसार आंदोलन करू व त्याची संपूर्ण जवाबदारी आपली व आपल्याच प्रशासनाची राहील याची नोंद आपण घ्यावी करिता निवेदन सादर करण्यात आले.

    निवेदनाच्या प्रतिलीपी नामदार बच्चुभाऊ कडु अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग जिल्हाधिकारी साहेव बुलढाणा जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी बुलढाणा जि. पोलिस अधिक्षक बुलढाणा यांना पाठविण्यात आल्या यावेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,शत्रुघन ईंगळे,शेखर तायडे,वसंत चीखलकर,धनश्याम येवले,तुळशिराम वसोकार,अशोक शिंगाडे,आशिष हजारे, ऊमेश देशमुख,सोपान घानखेडे,आकाश दांडगे,सुनिल ईंगळे,सचीन सावंत,पल्लवी पाटील,शंकर रत्नापारखी,भागवत बानाईत,गजानन देशमुख,पाटिल बोरी आदी यावेळी हजर होते