चिंचोली (बु.) येथे उर्स मुबारक व शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम

    287
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.21फेब्रुवारी):- अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिशती चिंचोली(बू) ता. ब्रम्हपुरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि.23 फेब्रुवारी 2024रोज शुक्रवारला रात्रौ 8 वाजता अम्मासाहेब , शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गद्शनाखाली ऊर्स मुबारक व मान्यवरांचे जाहीर सत्कार तसेच शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

    सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ,खासदार अशोक नेते , आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार किष्णा गजभे , आमदार किशोर जोरगेरवार,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी नगराध्यक्ष इतेश्याम अली वरोरा, तुषारभाऊ सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, सतिश वाजूरकर उपाध्यक्ष ओबीसी महासंघ प्रदेश, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, विनोद संकत, शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर, भास्कर डांगे, राकेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे, डा. नामदेव किरसान, महेद्र ब्राम्हणवाडे,उषाताई चौधरी तहसीलदार ब्रम्हपुरी, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपरी, ठाणेदार अनिल जिट्टवार,स्मिताताई पारधी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी व सार्वजनिक मंडळ चिंचोली( बू ) यांच्या वतीने. दरबारी सत्कार सत्कारमूर्ती प्रकाशभाऊ सावकार पोरेद्दीवार अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बँक,मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली,घनश्याम जीवनजी कावळे नागपूर , प्रल्हाद धोटे वडसा, नामदेव कुथे जेष्ठ नागरिक चिंचोली(बु) तसेच पाल्य पुरस्कार कु. कूनिका लालाजी पारधी ब्रम्हपुरी, कू. यामिनी किशोर मेश्राम आरमोरी, आलाप तुषार सोम चंद्रपूर, रोशन देविदास दिवटे चिंचोली (बू) यांचा दरबारच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

    रात्रौ दहा वाजताच्या दरम्यान असलम मुकरम साबरी सहारनपूर (युपी )व राजा सर्फराज साबारी रायपूर (युपी )यांची दुय्यम कव्वालीचा शानदार कार्यकम होणार आहे. आलेल्या भाविक भक्तांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी समस्त जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी च्या वतीने करण्यात आले आहे.