Advertisements
?चिमुर तालुक्यातील टेकेपार येथील घटना
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.4ऑगस्ट)-पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील ग्राम टेकेपार येथे आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे वय 25 वर्ष रा. टेकेपार याने त्याचे ओळख असलेला 2 वर्षाचा मुलगा यास स्वतःचे घरी नेऊन त्यांचेवर अनैतिक कृत्य केले. हे कृत्य करताना मुलाची आई हिने स्वतः पाहिले,तेव्हा तिने आरोपीस हटकले असता आरोपीने मुलाचे आईस शिवीगाळ केली,त्यानंतर मुलाचे आईने चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार केली ,त्यावरून चिमूर पोलिसांनी कलम 377,504 भां.द .वी . सहकलम 5 म, 7,8 पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढिल तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक कांता रेजिवाड तपास करीत आहे