ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी केले स्वतःची ‘मासिक’ प्रकाशित

    228

    रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
    ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल, ब्रम्हपुरी यांनी आज दि.30 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्वतःचे मासिक “BPS BULLETIN” प्रकाशित केले.
    30 एप्रिल हे भारतामध्ये राष्ट्रीय प्रामाणिकता दिन म्हणून साजरे केले जाते. याच दिवशी ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थी समितीने ह्या नवीन उपक्रमाची सुरुवात केली.
    विविध वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बातमी गोळा करणे, लेख लिहिणे, चित्र काढणे, टंकलेखन असे पत्रकारितेशी संबंधित सर्व प्रक्रिया पार पाडल्यात. या मासिके मध्ये ब्रम्हपुरी शहरासोबत इतर विषयांवर सुद्धा माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे विविध विषय यात मांडले आहेत.
    या मासिकेचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन संस्थेचे सचिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे प्रिन्सिपॉल डॉ. देवेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतच ज्युनिअर व सिनियर कॉलेज चे प्राध्यापक सुद्धा उपस्थित होते.
    शालेय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या उद्देशाने उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    मोबाईल पिढी च्या विद्यार्थ्यांना वाचनाची ओढी निर्माण व्हावी, समाजात सुरू असलेल्या घडामोडीबद्दल ते जागरूक असावेत, आणि एक चमू म्हणून औद्योगिक उपक्रम कसा राबवावा हे सर्व बाबी या मधून विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील. डॉ. देवेश कांबळे यांनी या प्रयत्नांची अभिनंदन केले. विद्यार्थी चमू ने आपल्या या उपक्रमाची प्रेरणे चे स्रोत व मार्गदर्शिका म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका रीमा कांबळे यांचे आभार मानले.