निवडणूकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करून कर लावला पाहिजे!

    336


    आर एस एस प्रणित भाजपा सरकार केंद्रात आल्या पासून मोदी सरकार म्हणून देशाची ओळख झाली होती. भारत सरकार लिहण्यास प्रशासकीय अधिकारी सुद्धा घाबरत होते. ते ही मोदी सरकार लिहत असत.२०१४ च्या अगोदर मोदीच्या टीमवर्कने म्हणण्या एवजी गँगने महागाई, भ्रष्टाचार, काळेधन, बेरोजगारी,शेतकऱ्यांना हमीभाव,गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिजेलवरची भाववाढ आणि शिक्षणातील आरोग्यातील आरक्षण या विरोधात जे जे जन आंदोलन करून देशातील नागरिकांना शेपन्न इंच छाती दाखवून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले होते.त्याचे अनुभव भारतीय नागरिकांनी घेतले असल्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड असंतोष बाहेर पडेल अशी परिस्थिति देशात असतांना निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी झाला ही खूपच चिंताजन परिस्थिति म्हणावे लागेल. म्हणजेच मताची किंमत भारतीय नागरिकांना कळली नाही. असा त्याचा अर्थ होत आहे. म्हणूनच निवडणूकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करून कर लावला पाहिजे.
    भारतीय नागरिक म्हणून राज्य व केंद्र सरकारच्या सार्वजनिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या निवडणूकीत मतदान न करणाऱ्या नागरिका कडून तीन टक्के कर वसुल करण्यात आला पाहिजे.अन्न धान्य, शिक्षणं आरोग्य उपभोग घेतांना आणि रेल्वे,एस टी प्रवास करताना त्यांनी नागरीक म्हणून मतदान न केल्यामुळे पांच वर्ष प्रत्येक ठिकाणी तीन टक्के कर वसूल करण्यात आला पाहिजे. आपण हॉटेल मध्ये चहा प्यायला जेवण करण्यासाठी गेले असता जी एस टी भरावा लागतो. कोणती वस्तु विकत घ्या किंवा प्रवास कर. सर्व ठिकाणी जी एस टी भरावा लागत आहे.त्याचं पद्धतीने मतदान न करणाऱ्या नागरिकांवर हा सक्तीने कर लावला पाहिजे.तेव्हाच त्यांना मतदानाची किंमत कळेल.आज २० मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई सह १३ मतदारसंघातील मतदारांनी मतदान करण्यास उदासीनता दाखवली ही खूप खेदाची व शरमेची बाब आहे.
    भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. त्यामुळेच राणीच्या पोटी राजा जन्मा येत नाही तर मतदानाच्या पेटीतुन देशावर राज्य करणारा राजा निवडण्याचा अधिकार दिला असतांना नागरिक त्याचा हक्क अधिकार गाजवित नोंदवीत नाही. त्यांना मतदान न शिक्षा पाच वर्ष मिळाली पाहिजे. तरच लोकशाही वाचवता येईल अन्यता मोदीची हुकुमशाही मोदी सरकारची हुकुमशाही नागरिकाचे मूलभूत अधिकार नष्ट केल्या शिवाय राहणार नाही. ज्यांना मत दानाचे महत्व समजले नाही त्यांना ते समजण्यासाठी युद्ध पातळीवर उपाय योजना करावी लागेल.मतदान न करण्यासाठी त्यांनी कोण कोणत्या सबबी सांगितल्या असतील.त्यांचा आपण विचार करू या.दररोज कामासाठी जाणारे मतदानची सुट्टी घेऊन बाहेर खूपच उकडतंय होता म्हणून मतदान करण्यास गेलो नाही असे बेशरम पणे सांगतात त्यांना त्याची शिक्षा मिळलीच पाहिजे.मतदार केंद्रावर रांगेत उभे न राहत सांगतात मतदान केंद्रावर खूप गर्दी होती म्हणून. मतदान यादीत नाव सापडले नाही. उन्हामुळे बाहेर जाण्याची भीती वाटत होती. सर्वच चोर आहेत मतदान करून काय फायदा? घरी पाहुणे होते. माझ्याघरी कोण्याच उमेदवाराने संपर्कच केला नाही.सर्वच राजकीय पक्षांची विश्वासाहर्ता संपली आहे. आणखी एक माझ्या एकट्याच्या मताने काय बदल घडणार आहे. अतिशाहणे म्हणतात मला तर कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही. मतदानसाठी अनायासे सुट्टी मिळाली आहे तर कशाला सोडा,मतदान करून कोणाचं भलं झालं आहे.असे म्हणणाऱ्याला जागो जागी पाच वर्ष मतदान न करण्याची शिक्षा मिळाली पाहिजे.
    भारतीय नागरिक म्हणून मिळाले मूलभूत अधिकार लक्षात घ्या मतदान न करणाऱ्यानी अशा कोणत्याही सबबी सांगितल्यास त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल हे त्यांना कळले पाहिजे. मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे भ्रष्टाचारी बेइमान चरित्रहीन नेत्याचे सरकार आले तर ते अन्याय अत्याचारा विरोधात जन आंदोलन करणाऱ्याला आंदोलनजीवी ठरवणार आहे.त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न्यायालयातील न्यायमूर्ती करणार असतील तर न्याय कुठे मागणार आहोत. तुम्हाला हे भारतीय नागरिक म्हणून चालणार आहे का? देशाला चालणार आहे का? याचा विचार मतदान न करणाऱ्यानी केला पाहिजे. त्यांनी हा विचार केला नाही म्हणूनच त्यांना निवडणूकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करून कर लावला पाहिजे. भारताची आर्थिक आणि औधोगीक राजधानी ही मुंबई ही आहे, तशीच ती मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४० टक्के व्यापार आणि ७० टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात.सर्वात मोठा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा व्यापार धंदा करणारा संघटित असंघटित कामगार कर्मचारी अधिकारी असलेला नागरिक मतदार हा मुंबईत राहतो. त्याच्या मध्ये मतदान करण्यास उदासीनता असणे म्हणजेच पैसाने सर्वच विकत मिळत असेल तर मतदानाला काय किंमत द्यावी ही मानसिकता बदलण्यासाठी मतदान न करणाऱ्या या शहरातील नागरिकांना मतदान न करण्याची शिक्षा मिळलीच पाहिजे. निवडणूकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करून कर लावला पाहिजे.
    सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई.
    मो. ९९२०४०३८५९