✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर :- म.रा.प्रा. शिक्षक भारती चिमूर तालुका कार्यकारिणीची निवड सहविचार सभेत करण्यात आली. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे होते. याप्रसंगी शिक्षक भारती विशेष शाळा चंद्रपूर जिल्हा सचिव रामदास कामडी, चिमूर तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे, सुकदेव टिकले प्रामुख्याने उपस्थित होते. रावन शेरकुरे सेवानिवृत्त झाल्याने नवीन तालुका अध्यक्षांची निवड या सहविचार सभेत करण्यात आली.
चिमूर तालुका अध्यक्ष म्हणून कैलाश बोरकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. सचिवपदी विशाल वासाडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी संजय सर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून नरेश पिल्लेवान, आतिश गावंडे, मिलिंद रामटेके यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी बंडू नन्नावरे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून रावन शेरकुरे यांची निवड करण्यात आली. सहविचार सभेला शिक्षक भारती सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. सहविचार सभेचे संचालन कैलाश बोरकर यांनी केले. प्रास्ताविक रावन शेरकुरे यांनी केले. आभार बंडू नन्नावरे यांनी मानले.