✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर :- राज्याच्या महायुती शासनाने पावसाळी अधिवेशनात महिलांच्या आर्थिक स्वातत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबात निर्णायक भूमिका करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. भिसी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावे असे भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. मंजुषाताई ठोंबरे यांनी केले आहे.महिलांना कागद पत्र संदर्भात काही अडचणी असतील तर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात सोडविण्यासाठी प्रयत्नात राहू.भाजप पदाधिकारी महिलांनी इतर महिलांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे.
भाजयुमो माजी तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांच्या निवासस्थानी बैठकीत तालुका महामंत्री सौ.दीपाली बानकर, सौ.मंजुश्री मुंगले,सौं.योगिता गोहने,सौ.काकपुरे ताई, सौ योगिता पाटील सौ साधना मुंगले,श्रीमती इंदिरा नागपुरे, सौ.मंजूषा खवसे,सौ.लता,सौ.दीपाली नेरलावार,सौ.उघडे मॅडम,सौ.घरडे सौ लता उघडे,सौ.तुरारे ताई सौ.मीरा ठोंबरे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.