चिमूर शहर काँग्रेसने खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करुन केला वाढदिवस साजरा

409

 

चिमूर,
गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वुर्क्षरोपण करुन प्रदेश काँग्रेस महासचिव तथा माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांच्या उपस्थितीत चिमूर शहर काँग्रेस तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील,माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके,शहर अध्यक्ष अविनाश अगडे, किसान सेल तालुका अध्यक्ष राजु कापसे, ओबीसी शहर अध्यक्ष प्रदीप तळवेकर,मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख ,खासदार साहेबांचे स्वीय सहायक राजु चौधरी,शहर उपाध्यक्ष अमोल जुनघरे,तालुका सचिव विलास मोहीनकर, दीपक कुंभारे,मंगेश घ्यार ,युवक काँग्रेसचे जि.महासचिव गौतम पाटील, नेरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिसे,अक्षय लांजेवार,रोहन नन्नावरे,श्रीकांत गेडाम,शार्दुल पचारे,अनिल शेंबेकर व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.