बालगून्हेगारी म्हणजे बालकाकडून होणारे गुन्हासदृश असे ढोबळ मानाने म्हणता येणार.
बालगून्हेगारीचे कारण शोधत असतांना असे दिसून येते की, बालगून्हेगारीसाठी कोणतेही एकच कारण कारणीभूत नाही आहे तर समाजाचा संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार करता बालगून्हेगारीसाठी सामाजिक, आर्थिक व मानसिक कारणे मुख्यत: कारणीभूत दिसून येतात. बालगून्हेगारीत सामाजिक कारणात कुटुंब,कुटूंबाचे स्वरूप, भग्न कुटुंब, आई-वडिलांचे मार्गदर्शन व त्यांचा कडून होत असलेला तिरस्कार यात इत्यादी कारणांचा समावेश असतो.तर मानसिक कारणात बौद्धिक दुर्बलता, मानसिकरोग, व्यक्ती महत्वाची लक्षणे, संवेदनात्मक अस्थिरता या कारणांचा समावेश असतो आणि आर्थिक कारणात बेकारी व दरिद्र्य या कारणांचा प्रामुख्याने समावेश करावासा वाटतो या सर्व कारणांमुळे समाजात बालगुन्हेगारी दिसून येते आहे.
१)बालकांचे दोषपूर्ण सामाजिकरण :- बालगून्हेगार निर्माण होण्यासाठी दोषपूर्ण सामाजिकरण हे प्रमुख कारण मानले जाते. ज्या कुटूंबातील प्रमुख पुरूषाचा मृत्यू होतो किंवा पती-पत्नी मध्ये घटस्फोट होऊन वेगळे राहत असतात अशा कुटूंबाला भग्न किंवा विस्कळीत कुटुंब मानले जाते. असा सहवासातल्या मुलांचे योग्य पद्धतीने सामाजिकरण होत नाही असा कुटूंबातील मुलांना प्रेम, वास्तल्य, स्नेह प्राप्त होत नाही आणि गून्हेगारी क्षेत्राकडे जातात.
२)वाईट संगत :-बालगून्हेगारीत वाईट संगत ही सुद्धा महत्वाचे कारण आहे. कुटूंबानंतर मुलांचा सामाजिकरणात शाळेचा मोठा असतो. जेव्हा बालक मोठा होतो तेव्हा तो शाळेत जातो. त्याला अनेक सवंगडी किंवा सोबती मिळत असतात. त्याचा सवंगडी किंवा सोबती मध्ये काही वाईट वर्तन करणारे सुद्धा असतात. त्याचा सोबत राहून तो सुद्धा वाईट वर्तन करू लागतो. जेव्हा बालकांना वाईट संगत प्राप्त होते तेव्हा तो फार लवकर गुन्हेगारी
प्रवृतीला आत्मसात करत असतो.
३)मानसिक रोग :- गुन्हाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासकांना असे आढळले आहे की, गुन्हेगारी हे मानसिक रोगाने पीडित असतात. असे मानसिक रोगग्रस्त मुले ज्या कुटूंबाला जन्माला येतात त्यांना प्रेम, स्नेह व नियंत्रनाचा अभाव आढळतो अशी मुले भांडखोर प्रवृत्तीची अति असामाजिक कृत करणारी, निर्दयी असतात. म्हणूनच स्वाभाविकपणे असे मुले हिंसात्मक क्षेत्राकडे जात असतो.
बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.
१) योग्य समाजिकरण :-कुटूंबात मुलांचे पालन-पोषण चांगल्या रीतीने होणे खूप आवश्यक आहे. कुटूंब ही मुलांची आद्य शाळा असते. कुटूंबाचा वातावरणात मुलांवर जास्त प्रभाव पडत असतो. म्हणून कुटूंबातील आई-वडील व इतर सभासदांनी मुलांना योग्य वळण लावणे व त्यांचे समाजिकरण करणे तेवढेच आवश्यक असते.
२) योग्य शिक्षण :-बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जेवढा आई -वडिलांचा वाटा असतो. शाळांचा सुद्धा संबंध असतो. शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञाना सोबतच नैतीक, सामाजिक व इतर प्रकारचे ज्ञान देणे तेवढेच आवश्यक आहे. शाळेत मुलांना नागरिकतेचे धडे देणे आवश्यक आहे म्हणजे मुले समाज विरोधी वर्तन करणार नाही आणि गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर राहणार.
३)मार्गदर्शन व सल्ला केंद्र :- माता – पित्यांना बालकांचा समाजिक करणाचा संदर्भात मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला केंद्राची स्थापना करावी. या केंद्रातून माता -पित्यांना योग्यसल्ला देऊन बालक गुन्हेगारी क्षेत्राकडे जाणार नाही याची काळजी घेता येणार.
✒️सुयोग सुरेश डांगे(संपादक पुरोगामी एकता)मो:-8208946716