ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यावर अन्याय ;महाडिबीटी स्कॉलरशिप नाकारल्यामुळे विध्यार्थी हतबल

34

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात त्याची सविस्तर माहिती महाडिबिटी च्या वेबसाईटच्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांना उपयुक्त अशा शिष्यवृत्तीच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतात
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने राबवलेली एक योजना असून या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे.

महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे जी राज्यभरातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. ही योजना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.परंतु जेव्हा पासुन ऑनलाईन पद्धती अस्तित्वात आली आहे तेव्हा पासून काही विद्यार्थ्यांचे अर्ज हे क्यूरी दाखवून नाकारले जातं आहेत यासंदर्भात विद्यार्थ्यांना त्याचा मेसेजपण येत नाही त्यामुळे स्कॉलरशिप मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत स्कॉलरशिप ही सरळसरल नाकारली जातं आहे याबाबतीत समाजकल्यान कार्यालय सुद्धा उदासीन आहे काही कॉलेजस मध्ये या विद्यार्थ्यांकडून फी जमा करूनच दाखले दिल्याचे पाहाव्यास मिळत आहे यामुले त्यांच्यावर अन्याय होत आहे समाजकल्यान कार्यालयाचे पत्र असून सुद्धा कॉलेजस विध्यार्थ्यांची फि साठी अडवणूक करत आहेत.
समाजकल्यान कार्यालयाकडून या कॉलेजस वरती कारवाईची मागणी विद्यार्थी करत आहेत आणि यापुढे महाडिबीटी ऑनलाईन पद्धतीमध्ये पारदर्शकता आणून आणि ऑनलाईन बरोबर ऑफलाईन अर्जंपण भरून घ्यावेत आणि विद्यार्थ्यावर होणारा अन्याय थांबवण्यात यावाव ज्या विध्यार्थ्यांची स्कॉलरशिप नाकारली गेली आहे त्यांना पुढील वर्षाची फी माफ व्हावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे