माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी घेतल्या कार्यकर्त्याच्या भेटी

190

गडचिरोली -तालुक्यातील अमिर्झा येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी विविध ठिकाणी जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या भेटी घेतल्या. या भेटीत गावाच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम राबवण्यात आले. या दोन्ही उपक्रमांमुळे महिलांच्या हातात सत्ता येणार असून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता या योजनांचे यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी सरकार, समाज आणि महिलांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.

गावातील समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या निराकरणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचावी हा या भेटी मागचा मुख्य उद्देश होता.
यावेळी सुनील आयतुलवार, आशिष नागरे, अजय सूर्यवंशी, देविदास नागरे, गुणाजी हेटकर, पंढरी दोळके व महीला मंडळी आदी गावकरी उपस्थित होते.