मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – प्रहार (उमरखेड उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन)

293

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. ३० जुलै) तालुक्यात पंचायत समिती व महसूल विभागात असलेले कर्मचारी व अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहून आपले कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे.

परंतू उमरखेड येथील पंचायत समिती व महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर न राहता ते बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करतात, घरभाडे व शासनाची फसवणूक करुन घरभाडे व भत्ता उचलणाऱ्या,कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शासकीय कायदयानूसार नियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर शासन नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

यावेळी निवेदन देतांनी,प्रवीण इंगळे (बाळदि शाखा अध्यक्ष), विवेक जळके (प्रसिद्धी प्रमुख), अविनाश दुधे, नितीन राठोड, प्रफुल वानखेडे, दीपक ठाकरे, व आदी उपस्थिती होते.