✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १ ऑगस्ट) येथील उत्तरवार कुटीर रुग्णालयाच्या जुन्या आणि जीर्ण इमारतीला गळती लागली असल्याने सदर इमारत कधीही ढासळून जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
भविष्यात होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी २०२३ पासून उद्घाटनाचे प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनापूर्वी रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात यावं अन्यथा स्वतंत्र दिनी कुटीर रुग्णालयासमोर आजाद समाज पार्टी उमरखेड तालुक्याच्या वतीने आरोग्य विभागाच्या ढीसाळ कारभाराच्या विरोधात “डफली बजाओ ” छेडण्याचा इशारा दिनांक 31 जुलै रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश मांडण यांना
आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा तालुका अध्यक्ष विष्णू वाडेकर, गोलू मुनेश्वर सुशांत धोंगडे, धम्मपाल गायकवाड, समाधान राऊत, विनोद बर्डे, माधव नवसागरे, आशिष काळबांडे, हर्षदीप काळबांडे, देवानंद पाईकराव, रविंद्र हापसे संभाजी हापसे, प्रतीक धोंगडे मुजीब लाला, विकास काळबांडे, शुद्धोधन निखाडे इत्यादी जन उपस्थित होते.