रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- स्थानिक ने.ही. कन्या विद्यालय, ब्रह्मपुरी येथे दिनांक 1 ऑगस्ट 2024 ला लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रित्यर्थ कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. बनपुरकर मॅडम तसेच प्रमुख अतिथी शाळेचे उपमुख्याध्यापक मा. विनोद भैय्या सर, पर्यवेक्षक मा. निखारे सर, ज्येष्ठ शिक्षक
मा. हटवार सर, ज्येष्ठ शिक्षिका मा. गोडे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित माझी मैना गावावर राहिली *’माझ्या जीवाची होतिया काहिली’* त्यांचा गाजलेला पोवाडा वर्ग 8वी च्या विद्यार्थ्यांनीनी अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. तसेच वर्ग 9वी ची विद्यार्थिनी कु. प्रतिज्ञा वाते लोकशाहीरांचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.
यानंतर कार्यक्रमाच्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. बनपुरकर मॅडम यांनी लो. टिळक कुशाग्र बुद्धीमत्तेचे होते, त्यांचा गणित विषयावर खूप पगडा होता. तसेच अण्णाभाऊ साठे बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, लोकशाहीरना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. मात्र जीवनाच्या व अनुभवाच्या शाळेत ते खूप काही शिकले. त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवून 21 कथासंग्रह व 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक दहीवले मॅडम व आभार प्रदर्शन बावनकुळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व शाळेच्या बहूसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
Advertisements